मास्क सक्तीची मोहीम अधिक तीव्र करीत महसूल तसेच पोलीस पथकाने आज भल्या पहाटेच विद्यापीठ परिसरात नागरिकांवर कारवाई केली. व्यायाम करण्याच्या निमित्ताने विना मास्क भटकणार्यांना 30 जणांना ताकीद देत कारवाईचा इशारा दिला. व्यायामासाठी बाहेर पडणार्याना प्रशासनाने टार्गेट केल्याने काहींनी नाराजीचा सूर आळवत ही तर व्यायामाची दमकोंडी असल्याची टीका केली.
संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात मास्क सक्तीची मोहीम जोरात सुरू केली आहे. जिल्हाधिकार्यांनी स्वतः कार्यालयात विना मास्क आलेल्या वन विभागातील अधिकारी कर्मचार्यांना पाचशे रुपये दंड ठोठावत कारवाईचा श्रीगणेशा केला होता. त्यानंतर ग्रामीण भागातही स्वतः जिल्हाधिकार्यांनी शेतकरी तसेच नागरिकांना मास्क वाटप केले. गावोगावी मास्क सक्ती करीत महसूल पथकांनी कारवाई जोरात सुरू केली आहे. विना मास्क फिरताना आढळल्यास पाचशे रुपये दंडाची शिक्षा दंड ठोठावण्यात येत आहे. शहरात पहाटेच्या वेळी व्यायामासाठी बाहेर पडणारे मास्क वापरत नसल्याच्या तक्रारी जिल्हा प्रशासनाकडे आल्या होत्या. विशेषतः रस्त्यावर तसेच मोकळ्या मैदानावर गर्दी होत असल्याचेही दिसून आले. व्यायाम करणारेही मास्क लावत नाही तसेच सोशल डिस्टंसिंग चा अवलंब करीत नसल्याच्या तक्रारी जिल्हाधिकार्यांकडे आल्या होत्या. त्या अनुषंगाने आज सकाळी सहाच्या सुमारास उपविभागीय अधिकारी न्यानोबा भानापुरे यांच्या नेतृत्वाखाली महसूल पथक विद्यापीठ परिसरात कारवाई केली. त्याच बरोबर विना मास्क फिरणार्या महिला, तरुण मुलांची नावे लिहून घेत प्रशासनाने यापुढे आढळला तर दंड ठोठावला जाईल, असा इशारा उपविभागीय अधिकारी बाणापुरे यांनी दिला आहे.
लाऊडस्पिकरद्वारे दिल्या सूचना
दरम्यान विद्यापीठ आणि गोगाबाबा टेकडी परिसरात व्यायाम करणार्यांना महसूल तसेच पोलीस पथकाने लाऊडस्पीकरद्वारे सूचना देण्यात आल्या. यापुढे विना मास्क आणि सोशल डिस्टंसिंगचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला. प्रशिक्षणार्थी जिल्हाधिकारी सागर, उपविभागीय अधिकारी ज्ञानोबा बाणापुरे, तहसीलदार किशोर देशमुख, जिल्हा माहिती अधिकारी मुकूंद चिलवंत, मंडळ अधिकारी बी.आर. घुसिंगे, तलाठी आर.डी. चव्हाण यांचा तसेच छावणी ठाण्याच्या पोलीसांचा या पथकात समावेश होता.